Sunday 2 July 2017

संमेलन निवेदन- २

संमेलन निवेदन- २🔆*_
*साहित्य काव्यगंध* - ओंजळ शब्द फुलांची
🏵 *साहित्य संमेलन*🏵
*नमस्कार साहित्य रसिक हो*
साहित्य काव्यगंध आयोजित पहिलेच संमेलन, आणि त्यासाठी आपण सर्वांनी दाखविलेले प्रेम संमेलन नावनोंदणीला दिलेल्या तुफान प्रतिसादावरुन दिसून आले. संमेलनाबाबत अधिक माहिती देत आहोत.
🔶 *संमेलनाचे नियोजित ठिकाण :* औरंगाबाद (महाराष्ट्र)
🔷 *संमेलनाचा नियोजित महिना:* ऑक्टोबर 2017
🔶 *संमेलनापूर्वीच्या महास्पर्धा:*
संमेलनापूर्वी कविता, कथा, चारोळी, अशा एकूण 3 महास्पर्धा घेण्यात येतील. या प्रत्येक स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम असे प्रत्येकी पाच व एकूण 15 विजेते निवडले जातील. सर्व विजेत्यांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्र मान्यवारांच्या हस्ते दिले जाईल (सदरील स्पर्धांबाबत सविस्तर माहिती स्वतंत्र निवेदनाद्वारे दिली जाईल.)

🔷 *प्रतिनिधिक काव्य संग्रह :*
संमेलनापूर्वी नावनोंदणी फॉर्ममध्ये ज्या सदस्यांनी "प्रतिनिधिक काव्यसंग्रहासाठी कविता पाठवणार आहे" अशी माहिती सादर केली आहे. त्यांच्याकडून विहित पद्धतीने कविता संकलित करून आकर्षक व दर्जेदार अशा प्रतिनिधिक काव्यसंग्रहाची निर्मिती केली जाणार आहे. या संग्रहात प्रत्येक कवी/ कवयित्रीची एक कविता तसेच त्यांचा परिचय छायाचित्रासह समाविष्ट केला जाईल.
🔶 *संमेलन फीस :-*
कुठलाही कार्यक्रम घ्यावयाचा म्हटल्यास त्यास आर्थिक पाठबळाची गरज असते. सर्व खर्चाच्या व जमेच्या बाजूचा विचार करून व संमेलन यशस्वीपणे पार पडावे म्हणून आयोजक कमिटीने पुढीलप्रमाणे फीस निश्चित केली आहे.
१) *संमेलनात फक्त सहभाग* घेण्यासाठी सहभाग फी : ₹ 100/-(शंभर ₹ फक्त )
२) *संमेलनात सहभागासह प्रतिनिधिक काव्यसंग्रहात कविता यासाठीची फीस* : ₹ 500/- ( पाचशे ₹ फक्त )
■ तथापि जे साहित्यिक मान्यवर स्व-इच्छेने संमेलनासाठी अतिरिक्त निधी देऊन आपले योगदान देऊ इच्छितात त्यांनी आयोजक कमिटीशी संपर्क साधावा.
■ ज्यांना संमेलनात आपले पुस्तक प्रकाशित करावयाचे आहे ते विशिष्ट देणगी मूल्य देऊन या भव्य समारंभात आपले पुस्तक प्रकाशित करू शकतील.
■ संमेलनासाठी अतिरिक्त निधी देणाऱ्या मान्यवरांच्या योगदानाची दखल साहित्य काव्यगंध कमिटीकडून घेतली जाईल व त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल.
(वरील सर्व मार्गाने जमा होणारा निधी हा संमेलनासाठीच्या नियोजनावर जसे संमेलनस्थळ भाडे, सहभागी साहित्यिकांचे जेवण, निवास व्यवस्था, बक्षिसे, प्रमाणपत्रे, प्रतिनिधिक काव्यसंग्रह छपाई, व इतर सर्व आनुषंगिक बाबी यावर खर्च केला जाणार आहे.)
🔶 *फीस्वीकृति :*
फी जमा करण्यासाठी लवकरच एक खाते क्रमांक दिला जाईल. व सदरील खात्यावर उपलब्ध सर्व मार्गाने निधी जमा करता येईल.
🔷 *नावनोंदणी :*
नावनोंदणी प्रक्रिया लिंक दि.30 जून अखेर बंद करण्यात आली असून नावनोदणी झालेली असल्याशिवाय संमेलनात आणि संमेलनानिमित्त होणाऱ्या महास्पर्धेत भाग घेता येणार नाही.
          तथापि लिंकवर नावनोंदणी करण्यापासून वंचित राहिलेल्या इच्छुकांची नावनोंदणी साहित्य काव्यगंध कोअर कमिटीच्या मान्यतेने व नियोजनाचा विचार करून व्यक्तिशः केली जाईल आणि याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
_सोबतच इतर अत्यावश्यक माहिती वेळोवेळी कळविली जाईल._
🏵 *साहित्य काव्यगंध कोअर कमिटी*